पाथरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत 

 प्रतिनिधी : अहमद अन्सारी (पाथरी/ परभणी)
पाथरी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत तालुक्यात आपला दबदबा कायम ठेवला आहे. निकालानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी चार गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर देवनांद्रा गटात शिवसेना शिंदे गटाच्या सौ. सुमनबाई चक्रधर उगले या विजयी झाल्या असून त्यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत वर्चस्व सिद्ध केले आहे.हदगाव गटातील लढत ठरली जिल्ह्यात लक्षवेधी हदगाव बु. जिल्हा परिषद गटातील लढत ही संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेची ठरली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिंक्य अनिलराव नखाते यांनी अटीतटीच्या लढतीत शिवसेना उबाठाचे सुरेश बाप्पा ढगे यांचा पराभव करत विजय संपादन केला. सतत तीन वेळेस निवडणूक लढवणारे ढगे यांना यावेळीही पराभव पत्करावा लागला, मात्र त्यांनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. तर बाभळगाव, कासापुरी आणि लिंबा या गटांतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. लिंबा गटातून आमदार राजेश दादा विटेकर यांचे नातेवाईक रुक्मिणीबाई पंडितराव भोसले यांनी विजय मिळवला आहे.कासापुरी गटात शिवसेना उबाठाचे डॉ. राम शिंदे यांच्यासाठी खासदार संजय जाधव यांनी दोन सभा घेऊन प्रचाराची जोरदार तयारी केली होती, मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुणा ज्ञानेश्वर कोल्हे यांनी विजय संपादन केला आणि विरोधकांना पराभव स्वीकारावा लागला.

पंचायत समितीत ही राष्ट्रवादीचा दबदबा

पाथरी पंचायत समितीच्या दहा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा, काँग्रेस आयने दोन जागा, शिवसेना उबाठाने तीन जागा, तर शिवसेना शिंदे गटाने एक जागा जिंकली आहे. देवेगाव गणात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला आहे. एकूणच पंचायत समितीमध्ये महायुतीच्या (राष्ट्रवादी + शिवसेना शिंदे) मिळून पाच जागा झाल्याने सभापती पदावर महायुतीचा दावा मजबूत झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. निवडणूक खर्चाच्या चर्चांनी वातावरण तापले यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही तालुक्यात मोठ्या चर्चेची ठरली. प्रचारात मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याची चर्चा असून मतदारांमध्ये ‘लक्ष्मीआस्त्र’ वापर झाल्याची जोरदार चर्चा ऐकू येत आहे. त्यामुळे ही निवडणूक तालुक्यातील सर्वाधिक खर्चिक निवडणूक ठरल्याचे बोलले जात आहे.आमदार विटेकरांच्या राजकीय ताकदीत वाढ झाल्याचे दिसून येते जिल्हा परिषद गटातील चार आणि पंचायत समिती गणातील चार जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात आपली ताकद वाढवली असून हा विजय आमदार राजेश दादा विटेकर यांच्या राजकीय भविष्यासाठी मोठा आधार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. पाथरी तालुका : जिल्हा परिषद विजयी उमेदवार रुक्मिणीबाई पंडितराव भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस (लिंबा गट)वैजंताबाई अण्णासाहेब रणेर – राष्ट्रवादी काँग्रेस (बाभळगाव गट) अजिंक्य अनिलराव नखाते – राष्ट्रवादी काँग्रेस (हदगाव बु. गटअरुणा ज्ञानेश्वर कोल्हे – राष्ट्रवादी काँग्रेस (कासापुरी गट)सौ. सुमनबाई चक्रधर उगले – शिवसेना शिंदे (देवनांद्रा गट)पंचायत समिती गण विजयी उमेदवाररोहिणी नागोराव ढगे – राष्ट्रवादी (हदगाव बु.)सुनिता गजेंद्र डुकरे – राष्ट्रवादी (रेणाखळी)विद्या भगवान दुगाणे – राष्ट्रवादी (लिंबा)सचिन लिंबाजी अंबुरे – राष्ट्रवादी (वाघाळा)ज्ञानेश्वर गंगाधर शिंदे – शिवसेना उबाठा (रामपुरी खु.)श्रीधर किशनराव गिराम – शिवसेना उबाठा (बाभळगाव)मनिषाताई मुंजाभाऊ कोल्हे – शिवसेना उबाठा (कानसूर)प्रयागबाई बालासाहेब टेंगसे – काँग्रेस (रेणापूर)सत्तुबाई अप्पासाहेब घांडगे – काँग्रेस (कासापुरी)निशा पवन लालझरे – शिवसेना शिंदे (देवेगाव)एकूण निकाल (पंचायत समिती – १० जागा)राष्ट्रवादी ४ | काँग्रेस २ | उबाठा ३ | शिंदे १एकूण निकाल (जिल्हा परिषद – ५ गट) राष्ट्रवादी ४ | शिंदे १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *