येहळेगाव येथील अनेक कार्यकर्त्यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

कळमनुरी (प्रतिनिधी):- तालुक्यातील येहळेगाव गवळी येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी शिवसेना शिंदे गट तसेच भाजप मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा विश्रामगृह येथे पार पडला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे  नेतृत्व शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय सावंत (गोपू पाटील) व जिल्हा संघटक बाळासाहेब मगर यांनी केले. या वेळी तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, मारोतराव खांडेकर, चंद्रकांतभाऊ देशमुख, नागोराव खुडे, मधुकर कुरुडे, बाळासाहेब पतंगे, रुपेश पाटील सूर्यवंशी, विलासराव गांजरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवाजी देभाजी मंदाडे, शंकरराव गजाजी मंदाडे, संतोष संभाजी मंदाडे, उमेश लक्ष्मणराव मंदाडे, बापुराव साखरे, अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *