स्थायी व विषय समित्यांची निवड प्रक्रिया लांबणीवर

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी) :- येथील नगरपरिषदेची विशेष सभा सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी उप विभागिय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. नगरपरिषदेच्या स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकही नगरसेवक सभेला उपस्थित न राहिल्यामुळे सदर विशेष सभा होऊ शकली नाही. या विशेष सभेत कोणकोणत्या विषय समित्या नेमावयाच्या आहेत. याबाबत निर्णय घेणे, सदस्यांची संख्या निश्चित करणे, एकापेक्षा अधिक विषय समित्या नेमावयाच्या असल्यास उपाध्यक्ष कोणत्या समितीचा पदसिद्ध सभापती असेल ते ठरविणे, नगरसेवकांचे नामनिर्देशन करणे, उपसभापतीची निवड करणे आणि स्थायी समितीची रचना करणे, असे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र नगरसेवकांच्या अनुपस्थिती मुळे हि निवड प्रक्रिया लांबणीवर पडली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *