home

7 दिवसात हल्लेखोरांना अटक न केल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक , परिक्षेत्र ,नांदेड येथे धरणे आंदोलन

वंचित चा निर्वाणीचा इशारा कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- कळमनुरी तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे मा.तालुका अध्यक्ष राजूभाऊ कांबळे यांच्या जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.सदरील घटनेला 6 दिवस उलटले असून सुद्धा अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही, हि गांभीर्याची बाब आहे. सदरील घटना अज्ञात 3 व्यक्तीने घडून आणली असून पोलीस प्रशासनाकडून गेली 6 दिवसापासून हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही….

Read More

तहसीलदारांचा आदेश उच्च न्यायालयाकडून स्थगित

पाथरी तालुक्यातील वाघाळा प्रकरणाला कलाटणी प्रतिनिधी, अहमद अन्सारी (पाथरी /परभणी) :- पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील श्री मारोती मंदिर देवस्थानच्या जमिनीवरील ऊस पिकाचे उत्पन्न एका नोंदणी नसलेल्या समितीच्या बँक खात्यात जमा करण्याचे पाथरी तहसीलदरांचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगित केले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे याचिकाकर्त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.वायाघाळा येथील गट क्र….

Read More

देवदर्शनासाठी निघालेल्या चौघा भाविकांचा अपघाती मृत्यू

जिंतूर तालुक्यातील अकोली पुलावर घडली घटना;मयत गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी प्रतिनिधी, अहमद अन्सारी (पाथरी/ परभणी):- देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अकोली पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील पाच भाविक उज्जैन येथील धार्मिक…

Read More

शहरातील प्रभाग ८ मध्ये स्वच्छता अभियान

अयुब पठाण यांचा पुढाकार कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक तथा गटनेते अय्यूब पठाण यांनी स्वतः उपस्थित राहून स्वच्छता कर्मचाऱ्यां मार्फत प्रभागातील अनेक परिसरात स्वच्छता करून घेतली आहे. यावेळी अय्यूब पठाण यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ८ मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात…

Read More

येहळेगाव येथील अनेक कार्यकर्त्यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश

कळमनुरी (प्रतिनिधी):- तालुक्यातील येहळेगाव गवळी येथे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी शिवसेना शिंदे गट तसेच भाजप मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा विश्रामगृह येथे पार पडला. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. या पक्ष प्रवेश…

Read More

पवित्र रमजान महिन्यात स्वच्छता करण्याची मागणी मुस्लिम सेवा संघातर्फे न. प. प्रशासनाला देण्यात आले निवेदन

कळमनुरी(तालुका प्रतिनिधी):- येत्या 18 फेब्रुवारीपासून मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात शहरात नियमित स्वच्छता करावी, दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच बंद असलेले पथदिवे दुरुस्त करून सुरू करण्यात यावेत, अशी मागणी मुस्लिम सेवा संघातर्फे मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे…

Read More

हेल्मेट सक्ती करणारे प्रशासन निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

बीड (प्रतिनिधी):-बीड जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर सक्तीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह असला तरी, अपघातांची प्रमुख कारणे ठरणाऱ्या निकृष्ट व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. बीड ते अहिल्यानगर, बीड ते परळी, माजलगाव ते तेलगाव, मांजरसुंभा ते लोखंडी सावरगाव…

Read More

स्थायी व विषय समित्यांची निवड प्रक्रिया लांबणीवर

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी) :- येथील नगरपरिषदेची विशेष सभा सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी उप विभागिय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी प्रतीक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. नगरपरिषदेच्या स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र दुपारी साडेबारा वाजेपर्यंत एकही नगरसेवक सभेला उपस्थित न राहिल्यामुळे सदर विशेष सभा होऊ शकली…

Read More

शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांच्या प्रवेश अर्जास 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी) :- सन 2025-26 करिता राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करण्याची विद्यार्थ्यांकडून मागणी प्राप्त झाली होती. तसेच वसतिगृह…

Read More

पाथरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत 

 प्रतिनिधी : अहमद अन्सारी (पाथरी/ परभणी)पाथरी तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत यश मिळवत तालुक्यात आपला दबदबा कायम ठेवला आहे. निकालानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी चार गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर देवनांद्रा गटात शिवसेना शिंदे गटाच्या सौ. सुमनबाई चक्रधर उगले या विजयी…

Read More