काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या प्रतीमेस जोडेमारो आंदोलन करुन निषेध

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजीत पवार यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या वक्तव्याचे कळमनुरी शहरातील तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नेते च्या प्रतीमेस जोडो मारो आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला तसेच काँग्रेस पक्षाने तात्काळ माफी मागावी अशी ही मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक दिसून आले या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय गांवडे, बाजीराव सवंडकर, बाबुराव वानखेडे, मो. नाजीम रजवी, अब्दुला पठाण, अय्युब पठाण, आवेस पठाण, डॉ. दिलीप नाईक, कैलास खिलारे, ठाकुर सिंग बावरी, ॲड.तुषार पवार, ॲड. ईस्तेखार नाईक, आफजल भाई , विनायक हेंद्रे, संतोष आमले, शेख मोहम्मद, तात्याराव मगर, ज्ञानेश्वर फोले, मारुती प्रदीप सवंडकर, शोहीब बागवान, मुस्तफा बागवान,आदि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *