(सय्यद अजहर) ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कळमनुरी शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले होते. आज दिनांक,13 सप्टेंबर रोजी रोशनी ऑप्टिकल कळमनुरी येथे पार पडलेल्या या शिबिरात 200 पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यातील तपासणी मध्ये शंभर पेक्षा जास्त रुग्णांना ऑपरेशनची आवश्यकता असल्याने त्यांना आठ दिवसात नांदेड येथील रुग्णालयात जाऊन मोफत ऑपरेशन करून घेण्याचे सांगण्यात आले तर उर्वरित रुग्णांना औषधोपचार व लागलेले साहित्य मोफत वाटप करण्यात आले.तसेच ज्या रुग्णांना चश्मे लागणार आहेत त्यांना अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.या शिबिरात नेत्र रोग तज्ञ डॉ.सोहेल खान नांदेड, नेत्र रोग तज्ञ डॉ. संतोष खोकले हिंगोली, नेत्र तपासणी सहाय्यक डॉ. अमोल खाडे हिंगोली, तपासणी सहाय्यक डॉ. मुश्तहिद शेख कळमनुरी यांनी रुग्णांची तपासणी करून जवळपास 100 रुग्णांना औषधी व उपचार करण्यात आला तसेच ज्या रुग्णांना ऑपरेशन ची आवश्यकता आहे त्यांनी अल नूर हॉस्पिटल डॉक्टर लेन नांदेड येथे संपर्क साधून ऑपरेशन करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी शेख अमेर अरशद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आवेस पठाण,शेख मुस्ताक, मोहम्मद रफीक मो.खाजा, शोहेब बागवान, जाहेद खा पठाण, मुजाहेद खान पठाण, मोबिन खान पठाण, माबूद अश्रफी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कळमनुरी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न; दोन शे पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला लाभ