कळमनुरी वकील संघाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना दिल्ली विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ निवेदन

भारत सरकारचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी २० जुलै २०२६ रोजी लाखो विद्यार्थ्यांनी संसद भवनावर मोर्चा काढला होता त्यावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करून अश्रुधुरांच्या नळकांड्या टाकून हजारो विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून जखमी केले, या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक २३ जुलै २०२६ रोजी कळमनुरी वकील संघाच्या वतीने महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना…

Read More

निट मध्ये कळमनुरीच्या झिशान नाईकचे घवघवीत यश

कळमनुरी शहरातील शेख झिशान जावेद नाईक याने निट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. झिशानने 720 पैकी 594 गुण मिळवत 99.388 टक्के पर्सेंटाईल प्राप्त केले असून अखिल भारतीय स्तरावर (AIR) 11,881 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच जी एन प्रवर्गात 1,328 वी रँक मिळवून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.नीट…

Read More

कळमनुरीत अध्यक्ष,उपाध्यक्षांच्या हस्ते नगरपालिका कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नमस्ते दिनानिमित्ताने कळमनुरी नगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षा आश्लेषा वैभव चौधरी उर्फ आर आर पाटील ,उपनगराध्यक्ष शिवराज पाटील यांच्या हस्ते रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी अनिल भोरे नगरसेवक प्रतिनिधी बाळू पाटील, विलास उत्तमराव शिंदे, कुलभूषण बुर्से, नगरसेवक बाबा भाई, यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Read More

कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनकळमनुरी:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व….

Read More

कापूस सघन लागवड तंत्रज्ञान महत्व; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 परभणी (प्रतिनिधी ) अहमद अन्सारी :- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने प्रकल्प संचालक आत्मा दौलत चव्हाण, प्रकल्प उपसंचालक आत्मा अभिषेक घोडके व तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. 20 जुलै रोजी रेणाखळी येथे आत्मा अंतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कापूस पिकातील गळफांदी काढण्याचे महत्त्व आणि दादा लाड  लागवड तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन…

Read More

मानसिक आरोग्य जपणे ही काळाची गरज-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली

न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न हिंगोली(प्रतिनिधी) :- न्यायिक सेवेतील वाढता ताण, जबाबदाऱ्या आणि कार्यक्षमतेचा समतोल राखण्यासाठी मानसिक आरोग्य सुदृढ असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विशेष मानसिक आरोग्य कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख जिल्हा…

Read More

कळमनुरी तालुक्यातील भोसी ग्रामपंचायतचे बेकायदेशीर शाळेचे बांधकाम बंद करण्याचे कळमनुरी न्यायालयाचे आदेश

कळमनुरी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश मा.एस.पी.पांडव साहेब यांनी दि.१४ जुलै २०२६ रोजी एकतर्फा तात्पुरता मनाई हुकमाचा आदेश करून भोसी ग्रामपंचायतचे सरपंच विजय शामराव अवचार, ग्रामसेवक संतोष शिंदे ,गटविकास अधिकारी अमित मुंडे यांनी वादी सुरेश विठ्ठलराव राऊत,अमोल विठ्ठलराव राऊत,रूखमाबाई विठ्ठलराव राऊत,सौ.व्दारकाबाई बालाजी जाधव यांच्या मालकी व ताब्यातील शेत गट क्रमांक २१३ क्षेत्रफळ ६० जमिनीत शाळेच्या संरक्षण भिंतीचे…

Read More

खरीप पिकांसाठी 31 जुलैपर्यंत पीकविमा अर्ज करण्याचे आवाहन

• सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडदाचा समावेश हिंगोली (प्रतिनिधी):- खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना हिंगोली जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पाच पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी दि. ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी…

Read More