शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट; अपघाताची शक्यता


कळमनुरी शहरातील मुख्य रस्त्यालगत मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्याने अनेक वाहनांना अडथळा निर्माण होत आहे या मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातून जाणाऱ्या नांदेड- हिंगोली या मुख्य महामार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. तसेच याच मुख्य मार्गावर जवळपास सर्वच शासकीय कार्यालय आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील येणारी जनता ही याच मार्गाने ये – जा करीत असते त्यामुळे दुचाकी वाहनांची हि मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र त्याच रस्त्यावर मोकाट गुंरे ढोरे, शेळ्या, कुत्रे आदि मोकाट जनावरे मुक्त संचार करीत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे तसेच या मोकाट जनावरांमुळे अनेक वेळा अपघातही घडलेले आहेत. मात्र याकडे नगरपालिकेचे पूर्ण दुर्लक्ष असून या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *