(कळमनुरी तालुका प्रतिनिधी):- शहरातील मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे येत असताना, रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेजसाठी 24 इंची पाईप टाकण्याचे काम सुरू होते. मात्र पाईपमध्ये कचरा अडकल्यास संपूर्ण ड्रेनेज लाईन ब्लॉक होऊन घाण पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. व्यापारी बांधव व नागरिकांच्या मागणीची दखल घेत, मुख्य बाजारपेठेतील बुडकी नालीपर्यंत पाईप न टाकता मजबूत सी.सी. नाली करून देण्यात यावी अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षा आश्लेषा वैभव चौधरी उर्फ आर. आर. पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्या मुळे भविष्यात ही समस्या निर्माण होणार नाही तसेच नागरिकांच्या हितासाठी दर्जेदार व कायमस्वरूपी ड्रेनेज व्यवस्था उभारण्याचा निर्धार असून 100% नालीचे काम पूर्ण करून दिल्याशिवाय राहणार नाही,” असा शब्द नगराध्यक्षांनी उपस्थित व्यापारी बांधव व नागरिकांना दिला.या वेळी माजी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, उपनगराध्यक्ष शिवराज पाटील, नगरसेवक बबलू पत्की, प्रकाश नाईक, बाबा भाई, गजानन उर्फ बाळू पाटील, यांच्यासह व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पाईप ऐवजी सी.सी. नाली करण्याच्या सूचना :- नगराध्यक्षा आश्लेषा आर आर पाटील