(सय्यद अजहर):- पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी कळमनुरी पोलीस स्टेशन चा कारभार हाती घेतल्या नंतर सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर वचक बसविला असून दारू, मटका, जुगार या सह अवैध वाळू तस्करीवर हि लक्ष केंद्रित केले आहे. आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सोडेगाव शिवारात वाळू तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विकास आडे , हेड कॉन्स्टेबल देवकर, पोलीस कॉन्स्टेबल शेख रहीम, पोलीस कॉन्स्टेबल वाघ व ट्रेनी अंमलदार यांनी नांदापूर हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रॉली व एक ब्रास रेती जप्त केला असून अविनाश मारोतराव चव्हाण राहणार नांदापूर त्याला ताब्यात घेतले आहे तसेच त्याच्याकडील वाळू तस्करीत वापरणारा लाल रंगाचे ट्रॅक्टर क्रमांक लाल रंगाचे ट्रॅक्टर ज्याचा पासिंग नं MH-38 V-0224 नंबरचे स्वराज 744 एफ ई एन कंपनीचे ट्रॅक्टर हेड त्याचा चेसीस क्रं. WYCL40906052041 किं. अं. 3,50,000/ रुपये तसेच लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली किंमत अदांजे 1,50,000/रुपये मिळुन आले. सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीची एक ब्राँस रेती 5000/- रुपये असा एकुण 5,05,000 रुपये मुददेमाल जप्त करून गुरन व कलम 458/2026 कलम 303 (2) भा. न्या संहीता 2023 व महाराष्ट्र जमीन महसुल संहीता 1966 चे कलम 48 (7), 48 (8) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद
विकास प्रेमसिंग आडे पो.उपनि.यांनी दिल्यावरून अविनाश मारोतराव चव्हाण वय 40 वर्ष रा. नांदापुर ता. कळमनुरी जि. हिंगोली विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील
तपास सपोउपनि सांगळे हे करीत आहेत.
कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई; अवैध वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त