कळमनुरी पोस्ट ऑफिस चा भोंगळ कारभार;आधार कार्ड साठी नागरिकांची गर्दी

कळमनुरी (सय्यद अजहर)
नागरिकांना विविध कामासाठी आधार कार्ड अपडेट व आधार कार्ड संबंधित इतर कार्य करण्यासाठी येथील पोस्ट ऑफिस मध्ये चकरा माराव्या लागत आहेत नागरिकांच्या सोयीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये आधार अपडेट संबंधित कामे करण्यात येत असतात मात्र येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असून सुद्धा केवळ एकाच ऑपरेटर सिस्टीमवर हे आधार संबंधित कामे करण्यात येत आहे विशेष बाब म्हणजे फक्त पाच तास काम करण्यात येत असल्याने केवळ वीस ते पंचवीस नागरिकांचेच काम होत असून आलेले शेकडो नागरिक दररोज चकरा मारण्यास मजबूत झाले आहेत त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिस मध्ये इन्व्हर्टरची सुविधा नसल्याने वेळोवेळी लाईट गेल्यास सर्व कामे खोळंबली जात आहेत. याबाबत संबंधित पोस्ट मास्टर यांच्याशी संपर्क केला असता ऑन कॅमेरा बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला परंतु आम्ही दोन ते तीन वेळेस वरिष्ठांना याबाबत कळविले असून आम्हाला इन्व्हर्टर उपलब्ध करून द्यावे तसेच पूर्ण दिवस ऑपरेटर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे परंतु अद्याप पर्यंत ही मागणी मंजूर झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. एकाच ऑपरेटर वर सर्व भार असल्यामुळे आधार संबंधित कामे खोळंबली आहेत ग्रामीण भागातील जनता मात्र या मुळे चांगलीच वैतागली असून पोस्ट ऑफिस मध्ये इन्व्हर्टरची व पूर्णवेळ ऑपरेटर ची त्वरीत सोय करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *