वाकोडी शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १ लाख ७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलीस उपाधिक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलीसांची दमदार कारवाई

(सय्यद अजहर) कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील शेतातील लाकडी मांडवात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून १ लाख ७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास वाकोडी येथील किरण सुभाष काकडे यांच्या शेतातील लाकडी मांडवात काही इसम गोलाकार बसून पत्त्यांवर पैसे लावून ‘झन्ना मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. सदरील कारवाई पोलीस उपाधिक्षक मयुर रसाळ यांच्या मार्गदर्शानाखाली करण्यात आली या कारवाईत आरोपी गजानन राघोजी डाखोरे (रा. शेंबाळ पिंपरी), रामराव सोनबा काकडे (रा. गांगापूर), संतोष बळीराम काठाळे (रा. शेंबाळ पिंपरी), किरण सुभाष काकडे (रा. वाकोडी) तसेच एका अनोळखी इसमाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून ३७ हजार ९५० रुपये रोख, दोन मोबाईल फोन, सुमारे ५० हजार रुपये किमतीची हिरो सीडी डिलक्स दुचाकी (एमएच २९ बीएच ७८३३) आणि ५२ पत्ते असा एकूण १ लाख ७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी सपोनी रामदास निरडोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मदन गव्हाणे करीत आहेत. कारवाईनंतर आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *