शिक्षक दिनानिमित्त गुलाम नबी आजाद उर्दु विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा


कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- शिक्षक दिना निमित्त येथील गुलाम नबी आजाद उर्दु विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. गुलाम नबी आजाद उर्दू विद्यालयात शिक्षक दिना चे औचित्य साधत इयत्ता पाचवी ते आठवी विध्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात होते. प्राचार्य शेख लतीफ शेख जानी यांच्या मार्गदर्शना खाली या स्पर्धा कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी उपमुख्याध्यापक मिर्जा मंसूर बेग हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उमर फारूक शेख, म. जाहेद कुरेशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मिनम फातेमा, हया खालेद यांनी केले.कार्यक्रम यशस्वी साठी संस्कृतिक विभाग प्रमुख काशिफोद्दीन काजी, म. हफीज, जफर पठाण, सिबगत काजी, शाहेद हुसेन, मैनूल हक, म. रफिक, मिर्जा नूर बेग, जाकेरोद्दीन खतीब आदिनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *