कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):-
कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी कळमनुरी पोलीस स्टेशन चा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक अवैध धंद्याचे धाबे दणाणले असून चोरी छुपके चाललेल्या मटक्यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी विविध दोन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. या प्रकरणी मिलन डे नावाचा मटका चालवणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून रोख रक्कम व मटका चालवण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील मौजे तरोडा येथे मिलन डे नावाचा मटका चालू असल्याच्या गुप्त माहिती नुसार कळमनुरी पोलिसांनी छापा मारून यामध्ये 14450 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील मौजे तरोडा येथील संतोष निवृत्ती हरण वय 45 वर्ष व्यवसाय मजुरी रा.तरोडा यांच्या शेतातील आखाड्यावर मिलन डे नावाचा मटका चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा टाकून 4450 नगदी रुपये व एक रेडमी कंपनी चा मोबाईल जुना वापरता किंमत 10000 हजार रु असा एकुन 14450 रु.चा मुद्देमाल व एक बॉल पेन निळया रंगाचा व लाल रंगाची डायरी त्यावर आकडे लिहलेले असे मटका जुगाराचे साहीत्य जप्त केले. पो.उपनि. मदन संभाजी गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून गुरन व कलम 466/2026 कलम 12 (अ) म.जु.का. नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पुढील तपास पोउपनि मदन गव्हाणे हे करीत आहेत. तसेच कळमनुरी शहरातील कापसे कॉर्नर भागात मिलन डे नावाचा मटका चालू असल्याच्या माहितीवरून दुपारी चार वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यामध्ये शेख नजीर अब्दुल रौफ यास मिलन डे नावाचा मटका चालवताना पकडण्यात आले असून त्याच्याकडील नगद रक्कम 3930 रुपये व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 5 हजार रुपये असा एकूण 8930 रुपयाचा मुद्देमाल तसेच मिलन डे मटक्या साठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या बाबत पोलीस हवालदार दिलीप पोले यांच्या फिर्यादीवरून शेख नजीर अब्दुल रौफ याच्या विरुद्ध गुरन व कलम 467/2026 कलम 12 (अ) म.जु.का. नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप पोले हे करीत आहेत.
मिलन डे नावाच्या मटक्यावर कळमनुरी पोलिसांचे दोन ठिकाणी छापे; 14450 व 8930रु चा मुद्देमाल जप्त