(सय्यद अजहर)
शहरात बेकायदेशिररित्या व आवश्यक परवानगी न घेता सुरु असलेली विटभट्टी बंद करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कळमनुरी येथील शेत सर्व नं.21/ब, इनाम जामे मस्जीद जमीनीमध्ये हत्येचा फरार आरोपी शेख शकील शेख खलील हे कित्येक वर्षांपासुन फयाजोद्दीन मुखतारोद्दीन सिद्दीकी व अब्दुल गफार अब्दुल रहीम यांचे हिश्यात अवैधरित्या बेकायदेशीर, आवश्यक परवानग्या न घेता सुरु असलेले विटभट्टीमुळे होणारे वायु प्रदुषण, शेतीचे नुकसान, माती उत्खनन व नागरीकांचे आरोग्यास होणारा धोका वाबाबत तात्काळ चौकशी करुन सदर अवैध विटभट्टी बंद करणे व साहित्य जप्त करण्यात यावे तसेच विटभट्टीवर विद्युत पुरवठा सुध्दा मीटर न घेता विज चोरी करून वापरत आहे व शासनाचे व विद्युत कंपनीचे नुकसान करीत आहे. सदर इसमांविरुध्द कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये एम. पी. डी. 307, 302 हद्दपार, खंडणीचे व मोकोका चे गुन्हे दाखल आहेत. आता हत्या करुन फरार झालेला आहे. तो विटभट्टी व्यवसायातून येणारी रक्कम गुन्ह्याचे कामात वापरत आहे व विटभट्टीवर सागवान लाकुड, जळतन म्हणून वापरत आहे. विना रॉयल्टी माती उत्खनन करुन गोळा केली आहे तसेच वीटभट्टी ही गांवालगत आहे.
तरी साहेबांनी योग्य ती चौकशी करून सदर वीटभट्टी, साहित्य आणि सागवान लाकूड जप्त करण्यात यावे व विद्युत पुरवठ्याचे आकडे काढण्यात यावे व संबंधीतांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून सदरील निवेदनावर शमशीरअली खा शेरअली खाँ पठाण व ईतर 25 ते 30 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बेकायदेशिररित्या व आवश्यक परवानगी न घेता सुरु असलेली विटभट्टी बंद करण्याची मागणी