कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनकळमनुरी:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आणि विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. ‘आजच्या काळात पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,’ असा संदेश या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कळमनुरी यांच्या पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला.या प्रसंगी वसंतराव पतंगे संस्थेचे संचालक बाजीराव सवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस
अरुण मैडक जिल्हा उपाध्यक्ष
पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय गावंडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बावरीसिंग ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास खिल्लारे, डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. दिलीप मस्के नाईक, कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल खंदारे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष महारुद्रा सावणे, कामगार आघाडीचे तालुका सचिव आदिल सिद्दीकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख अफजल आदी मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *