निट मध्ये कळमनुरीच्या झिशान नाईकचे घवघवीत यश

कळमनुरी शहरातील शेख झिशान जावेद नाईक याने निट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. झिशानने 720 पैकी 594 गुण मिळवत 99.388 टक्के पर्सेंटाईल प्राप्त केले असून अखिल भारतीय स्तरावर (AIR) 11,881 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच जी एन प्रवर्गात 1,328 वी रँक मिळवून वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.नीट ही देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. अशा कठीण परीक्षेत झिशानने मिळवलेले यश हे त्याच्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीचे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे.गुणपत्रिकेनुसार झिशानला जीवशास्त्रात 99.89, रसायनशास्त्रात 99.70 आणि भौतिक शास्त्रात 97.47 पर्सेंटाईल मिळाले आहेत. एकूण 99.388 पर्सेंटाईल मिळवत त्याने उज्ज्वल कामगिरी नोंदवली. झिशानच्या या यशाबद्दल त्याच्या कुटुंबीयांचे अँड अजहरूद्दीन कादरी, अब्दुल हाफिज फारूकी, तनवीर नाईक,अँड. इलियास नाईक,शकील शेख,अँड मेहराज,अँड अरशद नाईक,अँड झिशान.खाजा पाशा,अँड मलिक शेख,अय्याज नाईक, सय्यद इरफान, अफजल उर रहेमान,इस्माइल रजवि शेख,शेख जावेद गणी, मोइज नाईक ,नूर पाशा ,नवीद पठाण,शेख आवेश, तौफिक आश्रर्फी,जमील उर रहेमान, अकरम नाईक व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *