कळमनुरीत ईद ए मिलादुन्नबी निमित्त मोफत नेत्र शिबिराचे आयोजन

(सय्यद अजहर)
कळमनुरी येथे जश्न ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने मोफत डोळे तपासणी आणि ऑपरेशन शिबिराचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष नाजीम रजवी यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांच्या डोळ्यांची संपूर्ण तपासणी केली जाणार असून गरजू रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याने कळमनुरी परिसरातील गरजू नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी मोहम्मद नाजीम रज़वी, रोशनी ऑप्टिकल्स, पोस्ट ऑफिस जवळ, कळमनुरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिबिराचे आयोजक माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *