(सय्यद अजहर)
कळमनुरी तालुक्यात पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडल्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, हळद, तुर, ऊस व इत्यादी पिक पाऊस नसल्यामुळे वाळून जात आहेत. याबाबत निवेदन देण्यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात आले असता तालुका कृषी अधिकारी व संबंधित इतर कर्मचारी गैरहजर असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर करपलेले सोयाबीन पीक व निवेदन चिपकवले. तालुक्यात जवळपास सर्वच ठिकाणी सोयाबीन पाण्या अभावी जाग्यावरच करपून पिवळे पडत आहे. आज रोजी सुध्दा पाऊस पडला तरी शेतकऱ्यांचे मुख्य पिक सोयाबीन हे हातातून गेल्यात जमा आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, मजुरी, खत, बि-बियाणे, औषधे व इतर कामासाठी उसनवार घेवून मोठा खर्च केला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळयासमोर वर्षभराची मेहनत आणि पैसा वाया जाण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना भविष्यात व कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणे, मुलांचे भविष्याचा शिक्षणाची फिस भरणे, कर्ज कसे फेडावे, लेकी-बाळीचे लग्न कसे करावे व असे अनेक प्रश्न शेतकऱ्यां समोर उभे आहेत. कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतातील पिकांची प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी करुन, पंचनामे करुन तात्काळ कळमनुरी तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई व पिकविमाचा लाभ मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयाच्या कृषी विभागात आले होते मात्र संबंधित कृषी तालुका अधिकारी हे उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांनी राग व्यक्त केला.
संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकले करपलेले सोयाबीन