(कळमनुरी तालुका प्रतिनिधी) :-
मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त दरवर्षी नुरी वेल्फेअर सोसायटी तर्फे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते त्या अनुषंगाने याही वर्षी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त दि. 26 ऑगस्ट रोजी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मागील नऊ वर्षापासून हा या मेळावा आयोजित करण्यात येत आहे. पैगंबर जयंतीची मिरवणूक संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील रुषदा फंक्शन हॉल येथे हा विवाह मेळावा पार पडला. या मध्ये कळमनुरी व इतर परिसरातील विविध 15 जोडप्यांचा विवाह येथे संपन्न झाला. मुस्लिम धर्मियांच्या विवाह परंपरेनुसार काझी यांनी नवरदेवांना अग्द पढविले. या विवाह सोहळ्याला 15 जोडप्यांच्या नवरदेव व नवरी यांच्या कडील नातेवाईकांसह शहर व परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह सोहळा संपन्न होताच सर्वांना जेवनाची ही व्यवस्था नुरी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने येथे करण्यात आली होती. या विवाह सोहळ्याच्या सामाजिक कार्यात अनेकांनी आर्थिक हातभार लावावा जेणेकरून भविष्यात आणखीन मोठ्या प्रमाणात हा विवाह मेळावा आयोजित करण्यास प्रोत्साहन मिळेल असे आवाहन हाजी मोहम्मद अब्दुल्ला अश्रफी,हाजी अब्दुल गनी बागवान, अजीज खा पठाण, ॲड इलियास नाईक,सोफी मुस्तफा बेग, शेख मतीन गुत्तेदार आदी कमिटी तर्फे करण्यात आले आहे.
पैगंबर जयंती निमित्त आयोजित विवाह सोहळ्यात 15 जोडपे विवाहबद्ध