कळमनुरी शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

कळमनुरी (तालुका प्रतिनिधी)
कळमनुरी शहरात ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर जयंती अति उत्साहात व धार्मिक घोषणाच्या गजरात पार पडली शहरातील रजा मैदान येथून ही भव्य मिरवणूक सकाळी नऊ वाजता शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत निघाली या वेळेस ठीक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था करण्यात आली होती. बालगोपाल सहित वयोवृध्द सर्वांनीच पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभाग नोंदविला. नारे तकबीर अल्लाह हु अकबर, सरकार की आमद मरहबा आदी घोषणात शहर दुमदुमला. सदर मिरवणूक मुख्य मार्गाने मार्गक्रम करीत पुन्हा रजा मैदान येथे पोहोचला. दुपारी बारा वाजेच्या सुमारास सर्व समाज बांधव रजा मैदान येथे एकत्र जमा झाले होते यावेळी मुस्लिम धर्मियांचा झेंडा फडकविण्यात आला. तसेच यावेळी मोठी प्रार्थना करण्यात आली त्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजनही याच ठिकाणी करण्यात आले होते. दरम्यान ईद मिलादुन्नबी निमित्त शहरात ठीक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *