कळमनुरी (तालुका प्रतिनिधी):- येथील प्रतिष्ठित व्यापारी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते अब्दुल्ला पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या हस्ते अब्दुल्ला पठाण यांना हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र मुंबई येथे देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष अँड.नाजेर काजी यांनी निवड केल्याबद्दल नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस वसमत विधानसभा मतदारसंघा चे आमदार राजू भैय्या नवघरे यांनी पुढील कार्यास व पक्षाचा प्रचार व प्रसार अजित दादा पवार यांचे विचार जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्या साठी कार्य करावे अश्या सूचना देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, हिंगोलीचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नेहाल भैय्या व राष्ट्रवादी काँग्रेस चे वसमत कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नम्मू हे उपस्थित होतें.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी अब्दुल्ला पठाण यांची नियुक्ती