(सय्यद अझहर)
विविध प्रकारच्या अवैध धंद्याचे कर्दनकाळ ठरलेले पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर वचक निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील आठवडी बाजार परिसरात टाईम बाजार नावाचा मटका जुगार चालू असल्याच्या माहिती आधारे कळमनुरी पोलिसांनी आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छापा टाकून मटका खेळताना व खेळवताना आढळून आलेल्या आठ जणाविरुद्ध कारवाई करून 14,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच आरोपींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले व नोटीस देऊन सोडण्यात आले. या बाबतची फिर्याद पोलीस शिपाई गजानन कोठुळे यांनी दिल्यावरून सदरील आठ आरोपीविरुद्ध 486/2026 कलम 12(अ) मा. जु. का. अन्नवे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नोटीस बजावून सोडण्यात आले पुढील तपास दिलीप फुले हे करीत आहेत.
टाईम बाजार नावाच्या मटका जुगारावर कळमनुरी पोलिसांच्या छापा