कळमनुरी (पठाण मुजीब) शहरातील मोठा मारोती मंदिर येथे २ सप्टेंबर रोजी श्री शिवछत्रपती गणेश मंडळाच्या कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांच्या एकमताने मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी अतुल शाईवाले व संदीप काळे यांची निवड करण्यात आली.
मंडळाच्या कोषाध्यक्षपदी कृष्णा पाटील व सोपान पाटील, सहकोषाध्यक्षपदी विजय जाधव, जय जाधव व सूरज लोंढे, सचिवपदी ओमकार पाटील, तर सहसचिवपदी किशन वाघ यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून राजू पाटील, गोविंद पाटील, शैलेश उभाळे, देवानंद काळे, महेश एकशिंगे, ज्ञानेश्वर वाघ, नितीन पाटील, उमेश काकडे, गणेश ठेंगे व प्रल्हाद काळे यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
श्री शिवछत्रपती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी रोशन पाटील तर उपाध्यक्षपदी अतुल शाईवाले व संदीप काळे यांची एकमताने निवड