झन्ना मन्ना जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा 69 हजार रुपयांचा मुद्देलाल जप्त

(सय्यद अजहर) कळमनुरीतील उत्कर्ष हॉटेलच्या पाठीमागे झन्ना मन्ना नावाचा जुगार चालू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4/09/2026 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कळमनुरी पोलिसांनी अचानक छापा टाकून जवळपास 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील उत्कर्ष हॉटेलच्या पाठीमागे झन्ना मन्ना नावाचा जुगार चालू असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. यावरून पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पोले, किशोर खिल्लारे, शेख रहीम, भिला वाघ, माने, विलास बांगर, हराळ, बलखंडे यांच्या पथकाने सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास छापा टाकून यातील 01) दिपक काशीनाथ पोटे वय 20 वर्ष रा. आसोला ता. कळमनुरी जि. हिंगोली, 2) माधव नामदेव झुंगरे वय 28 वर्ष रा.आसोलवाडी ता. कळमनुरी जि. हिंगोली, 3) अंबादास दादाराव कांबळे वय 22 वर्ष रा.आमदरी ता. औंढा ना जि. हिंगोली, 4) कल्यान वामन अंभोरे वय 55 वर्ष रा. शास्त्रीनगर कळमनुरी जि. हिंगोली यांना ताब्यात घेऊन जुगारातील नगदी रक्कम व साहित्य असे 69 हजार रुपयांचा माल हस्तगत केला असून पो. हे. दिलीप पोले यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गु.र.न.427/2026 कलम 12(अ) म.जु.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपींना नोटीस बजावून सोडण्यात आले पुढील तपास दिलीप पोले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *