जप्त केलेेले चोरीचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारास परत

कळमनुरी(तालुका प्रतिनिधी):- काही दिवसापूर्वी कळमनुरी शहरात चोरट्यानी संतोष सारडा यांच्या पत्नी च्या गळ्यातील 12 ग्रॅम सोन्याच्या गंठनची चोरी झाली होती सौ.संतोषी संतोष सारडा ह्या सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास व्यायाम करण्याच्या अनुषंगाने मुख्य रस्त्यावर चालत होत्या. एच डी एफ सी बँक समोर येताच दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी सौ. सारडा यांच्या गळ्यातील सदरील अलंकार लंपास करून भरधाव वेगाने पोबारा केला. परंतु काही अंतरावरच चोरटे दुचाकी घेऊन शिंदे पेट्रोल पंपाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला पडले त्यांना जबर मार लागला. विशेष म्हणजे सामाजिक व नैतिक अधिष्ठान असलेल्या संतोष सारडा यांच्या मुलांनीच त्या चोरट्याना दवाखान्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आणि चोरट्याचे प्राण वाचविले. त्यांच्या कडील अलंकार सुद्धा पोलीसात जमा करण्यात आले. या कार्याचे अंकित सारडा यांचे सर्व स्तरातुन कौतूक होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ, रघुनाथ शेवाळे हे करीत आहेत. दरम्यान 12 ग्रॅम सोन्याचे गंठन विद्यमान न्यायालयाच्या आदेशाने सौ. संतोषी संतोष सारडा यांना परत प्रदान करण्यात आले. या साठी न्यायालयिन कामकाज अँड.
प्रदिप तडस, अँड.संतोष नरवाडे व अँड.गुणानंद पतंगे यांनी पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *