कळमनुरी (तालुका प्रतिनिधी) :-
कळमनुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारातच पावसाचे पाणी साचले असून येथे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे याकडे मात्र तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.तहसील कार्यालय हे नांदेड हिंगोली मुख्य रस्त्यालगत असून विविध शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामासाठी येत असतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने या कार्यालयाच्या आवारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. याच पाण्यातून वाट काढत नागरिकांना कार्यालयात जावे लागत आहे. तसेच पायी चाललेल्या नागरिकांच्या अंगावर याच रस्त्यावरून मोटरसायकल जात असताना गलीछ्य पाण्याचे शिंतोडे त्यांच्या अंगावर जात आहेत. भली मोठी शोभिवंत प्रशासकीय इमारत असून सुद्धा आवारातच हे गलिच्छ पाणी जमा होत असल्याने या इमारतीची शोभा वाया जात आहे याकडे तहसील प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तरी तहसील कार्यालयाच्या आवारात साचत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करून हा मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे
कळमनुरी तहसील कार्यालयाला आले तळ्याचे स्वरूप